इंडिया टुडे या प्रख्यात राष्ट्रीय मासिकातर्फे दरवर्षीप्रमाणे जुलै २०२१ मध्ये भारतातील शासकीय तसेच खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांचे सर्वेक्षण करण्यात आले . या सर्वेक्षणात संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा भारतातील सर्वोत्तम खाजगी महाविद्यालयांच्या क्रमवारीत सलग चौथ्या वर्षी समावेश करण्यात आला आहे . या सर्वेक्षणानुसार राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय भारतात २१३ व्या तर महाराष्ट्रात ३० व्या क्रमांकावर असून मुंबई विद्यापीठात ७ व्या क्रमांकावर मानांकित झाले आहे . कोकणातील केवळ दोनच अभियांत्रिकी महाविद्यालयांचा या राष्ट्रीय क्रमवारीत समावेश करण्यात आला आहे . महाविद्यालयाच्या या यशामुळे कोकणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवण्यात आला आहे . इंडिया टुडे या मासिकाने घेतलेल्या सर्वेक्षणामध्ये विविध निकषांच्या आधारे भारतातील महाविद्यालयांची क्र...