राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अॅंड टेक्नोलॉजीमध्ये “ पदवी प्रमाणपत्र वितरण ” सोहळा संपन्न !!

आंबव, देवरुख येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित, मुंबई विद्यापीठ संलग्न राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अॅंड टेक्नोलॉजीमध्ये पदवी प्रमाणपत्र प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मुंबई विद्यापीठाच्या निर्देशानुसार महाविद्यालयातच पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात येते.सर्व विभागांचे मिळून जवळजवळ ९५ विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते.यावेळी पहिल्यांदाच स्नातकांनी पदवी पोषाख परिधान करून पदवी प्रमाणपत्र स्वीकारले. यापदवीप्रदान सोहळ्यासाठी अध्यक्षस्थानी कार्याध्याक्षा सौ.नेहाजी माने,प्रमुख पाहुणे श्री. जी.पी.बितोडे (असिस्टंट डायरेक्टर, जिल्हा कौशल्य विकास,रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,
रत्नागिरी), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत उपस्थित होते.
दिपप्रज्वलनानंतर सरस्वतीपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रा.डी.एम.सातपुते यांनी आपल्या प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या यशस्वी निकालाचे विश्लेषण केले. महाविद्यालयातून पदवी प्राप्त करणारी ही १६ वी बॅच असून आत्तापर्यंत ४००० विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केली आहे. याहीवर्षी महाविद्यालयाचे निकाल हे विद्यापीठाच्या सरासरी निकालापेक्षा सरस ठरले आहेत. महाविद्यालयाच्या विविध शाखांचे निकाल अनुक्रमे कॉम्प्युटर विभाग ९१.१८%, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभाग १००%, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉम विभाग ८३.९५%, मेकॅनिकल विभाग ८२.०९%, ऑटोमोबाईल विभाग ९८.७७% व एम.एम.एस. विभाग ९३.३३% असे आहेत. याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरुपात अमोल भागवत,आरती पाटणकर,विशाखा वेलदुरकर,चिन्मय शितुत,संचित अधटराव,सिद्धार्थ गुरव, तुकाराम येडगे,प्रसाद मोरे,रोहित कळंबटे आदी स्नातकांनी महाविद्यालयाप्रती आपल्या कृतज्ञता व्यक्त केल्या व आपल्या करिअरमध्ये संस्थेचे व प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे असे आवर्जून नमूद केले. स्नातकांनी यावर्षी प्रथमच पदवी पोषाख परिधान करून पदवी प्रमाणपत्र स्वीकारले व महाविद्यालयाने केलेल्या सोयीबद्दल
समाधान व्यक्त केले. आपल्या स्वागतपर भाषणात प्राचार्य डॉ.महेश भागवत यांनी स्नातकांना पदवी हा आयुष्याचा एक महत्वाचा भाग असून ही नवीन आयुष्याची सुरुवात असल्याची जाणीव करून दिली.
विद्यार्थ्यांच्या मागील चार वर्षांच्या श्रमाचे फळ त्यांना मिळाले असे त्यांनी सांगितले. महाविद्यालयाला नुकत्याच मिळालेल्या नॅकच्या ‘बी प्लस’ मानांकनाचा,एआयसीटीई सीआयआय सर्व्हेमध्ये सलग दुसर्यांदा मिळालेल्या सुवर्णश्रेणीचा तसेच आयएसटीई या संस्थेकडून महाराष्ट्र व गोवा विभागासाठीचा ‘बेस्ट इंजिनीअरिंग कॅम्पस’ या अॅवॉर्डचा आवर्जून उल्लेख केला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री. जी.पी.बितोडे यांनी विद्यार्थ्यांना नोकरी शोधण्याऐवजी स्वयंस्फुर्तीने उद्योजक बनण्याचा प्रयत्न करा,’येस बॉस नका म्हणू,स्वत: बॉस बना’ असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. यासाठी विविध शासकीय सुविधा उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी अशा अनेक संधींचा फायदा करून घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यशस्वी होण्यासाठी जोखीम घेणेही आवश्यक आहे तसेच प्रत्येकाने आपले स्वॉट अॅनॅलिसिस करावे असे ते म्हणाले. कार्याध्याक्षा सौ.नेहाजी माने यांनी उपस्थित स्नातकांचे अभिनंदन करून त्यांना भावी
वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.आपल्या ज्ञानाचे भांडार येणाऱ्या भावी विद्यार्थ्यांसाठी खुले ठेवावे अशी विनंती त्यांनी केली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.गुरुप्रसाद बुर्शे,प्रा.वैभव डोंगरे,प्रा.प्रसाद माने,प्रा.विस्मयी परुळेकर तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा.एस. डी. देठे यांनी केले. प्रा. इसाक शिकलगार यांनी आभारप्रदर्शन केले.


Comments

Popular posts from this blog

Report on Four days workshop on Internet of Things and serial buses”