राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालाच्या विद्यार्थ्यांचे पदवी परीक्षेत सुयश
आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या अभियांत्रिकी व व्यवस्थापन अभ्यासक्रम पदवीच्या अंतिम परीक्षेत सुयश प्राप्त केले आहे. महाविद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा विद्यार्थ्यांनी यंदाही कायम राखली आहे.
महाविद्यालयाच्या पाच विभागांपैकी ऑटोमोबाईल विभागाचा अदनान होडेकर याने ८.७६ पॅाइंट मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला. तर चिन्मय तेंडूलकर व दत्तप्रसाद भूरवणे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले. या शाखेचा निकाल ९४.८३ टक्के इतका लागला आहे.
महाविद्यालयाच्या संगणक विभागाचा एकूण निकाल ७५.६८ टक्के लागला असून त्यामध्ये सानिया हर्चीरकर हिने ७.८६ पॅाइंटसह प्रथम येण्याचा मान मिळवला. तर स्वप्नाली कांगणे व सलीना बोदले या विद्यार्थीनिनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले.
मेकॅनिकल विभागामधून तौसीफ मापारी याने ९.०५ पॅाइंटसह प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर अरबाझ नाकाडे व करिष्मा कदम यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविला आहे. या शाखेचा एकत्रित निकाल ९३.२४ टक्के आहे.
अणूविद्युत व दूरसंचार शाखेचा विद्यापीठाचा निकाल ९०.२४ टक्के आहे तर महाविद्यालयाचा निकाल ९४.७४ टक्के लागला आहे. या शाखेमधील जागृती काटे ही ९.०१ पॅाइंटसह महाविद्यालयात प्रथम आली आहे. या शाखेतील चिन्मय शिंदे व ईश्वरी नाईक यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.
महाविद्यालयाच्या एम एम एस या पदव्युत्तर अभ्यासक्रम शाखेचा निकाल ८३.७२ असून सुमित आंब्रे हा विद्यार्थी ९.३३ पॅाइंटसह महाविद्यालयात प्रथम आला आहे. तर भक्ती कुलकर्णी व वैभव गवंडी यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.
महाविद्यालयाच्या सर्व शाखांमधून २६९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ३४ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर १०१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. संस्थाध्यक्ष मा. श्री. रवींद्र माने, कार्याध्यक्ष सौ. नेहा माने, जान्हवी माने, उपाध्यक्ष श्री. मनोहर सुर्वे, सचिव श्री. चंद्रकांत यादव, सहसचिव श्री. दिलीप जाधव, प्राचार्य डॉ. महेश भागवत, परीक्षा विभागप्रमुख प्रा. विश्वनाथ जोशी व प्राध्यापकांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
अदनान होडेकर (AUTOMOBILE TOPPER)
सानिया हर्चीरकर (COMPUTER TOPPER)
तौसीफ मापारी (MECHANICAL TOPPER)
सुमित आंब्रे (MMS TOPPER)
Comments
Post a Comment